Crop Insurance: शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रीम रक्कम वाटण्यास सुरुवात, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

Crop insurance Maharashtra: कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता एक विमा योजनेअंतर्गत 965 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे व पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना हा निधी वितरित केला जाईल. खरीप हंगामामध्ये निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पिक विमा महत्त्वाचा ठरेल.

पिक विमा कंपन्यांच्या आक्षेपवरती सुनावणी होत असताना महाराष्ट्र राज्यातील 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याची जाणार आहे. पिक विमा कंपनी मार्फत नऊ जिल्ह्यांच्या बाबतीत अंशतः आक्षेप नोंद करण्यात आलेला आहे व सात जिल्ह्यांची सुनावणी पूर्ण झालेली आहे.

Crop insurance: या जिल्ह्यांना पिक विमा

अमरावती, नाशिक, नंदुरबार, धुळे, पुणे, अहमदनगर, बीड, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांना पिक विमा कंपन्या मार्फत आक्षेप नोंदवण्यात आलेला होता. आक्षेप नोंदवलेल्या जिल्ह्यांबाबत सुनावणी सुरू होती व तिचा निकाल लागण्याची माहिती समोर येत आहे.

अमरावती आणि पुणे जिल्ह्याचा अपवाद वगळला तर इतर जिल्ह्यांची सुनावणी पूर्ण झालेली असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सध्या संबंधित 24 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पिक विमा वाटपाची कारवाई सुरू झाल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र महासन्मान शेतकरी निधी योजना

विहीर खुदाई योजना