Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढणार का ? पुढील काही दिवसात पाऊस पडेल का?

IMD Alert : राज्यातील तापमानात सतत घट झाली आहे. त्यामुळे पहाटे थंडीची चाहूल लागली आहे. परंतु राज्यातील बरेच ठिकाणी दुपारी ऑक्टोबरचा उन्हाचा चटका अजूनही जाणवतोय. राज्यातील तापमानात किमान घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीच्या कडाक्यात वाढ होण्याचा हवामान अंदाज आहे.

खरीप हंगममधील पिकांना काढणीला कामाला गती आली आहे. तर काढणी झालेल्या ठिकाणी शेतकरी रब्बी हंगाम पिके लगबग करत आहेत. जमिनीतील ओल पाहून शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीचे नियोजन करावे, असं जाणकारांणी आवाहन केले आहे. 

Cold in maharashtra


राज्यातील विविध भागांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी थंडी जाणवत आहे. तसेच राज्यातील पुढील काही दिवसात हवामान कोरडे राहील असा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. मागच्या 24 तासात देशात राजकोट येथे कमाल 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यातील जळगाव येथे तापमानाचा पारा 13.2 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. तापमानात अजून घट होईल असा हवामान विभागाने अंदाज दिला आहे.

बंगालच्या उपसागरात काल तयार झालेलं हुमन चक्रीवादळ आज दुपारी बांगलादेशमधील चित्तगाव दक्षिण किनारपट्टीला जाऊन निवळले आहे. राज्यात पुढील काही दिवसात पावसाची शक्यता नाही. तसेच थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

हे पण बघा :

कांद्यानंतर झेंडूचे भाव घसरले, असा झालाय परिणाम

अन्नधान्य उत्पादन मध्ये विक्रमी वाढ

या तारखेला मिळणार नमो योजनेचा पहिला हफ्ता