Soybean Market : सोयाबीनचे भाव आजही हमीभावपेक्षा कमीच.
ऑक्टोबर २६, २०२३देशातील बाजारपेठांमध्ये सोयाबीनची आवक मागील काही दिवसात वाढत आहे दुसरीकडे सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमीच असल्यामुळे शेतकरी नाराज झालेले आहेत. सध्या सोयाबीनला सरासरी प्रति क्विंटल 4 हजार 400 ते 4 हजार 500 रुपयाचा भाव मिळत आहे. सोयाबीनचे भाव आणखी काय दिवसात हमीभावाच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
मागच्या दोन-तीन महिन्यात सोयाबीनचा दर हंगामातील हा पाच हजाराच्या खाली आला नेमकी ऑक्टोबर सप्टेंबर दरम्यान दरात काही तेज पाहिला मिळते. हंगाम सुरू झाल्यानंतर भावपातळी कमी होते. पण यंदा दोन-तीन महिन्यापासून सोयाबीन बाजारात निचांकी पातळीवर आहे.
सोयाबीनने 5 हजरांचा टप्पा पार पाडला नाही. हंगाम सुरु झाल्यानंतर दर कमी होत गेले. सोयाबीनचे भाव 4 हजार 200 रुपयांपर्यंत कमी झाले. मालामधील ओलावा कमी झाल्यानंतर दरात 200 रुपयांपर्यंत प्रति क्विंटल मागे सुधारणा दिसून आली. सध्या सोयाबीनला सरासरी 4 हजार 400 रुपयांचा भाव मिळत आहे.
सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. यंदा देशातील सोयाबीन उत्पादक शेतकरी घट झाली असून सुद्धा योग्य दर नाही मिळाल्यामुळे शेतकरी नाराज झाले आहे. सोयाबीनच्या उत्पादनात एकरी 30 टक्क्यांपर्यंत कमी झाली. एरवी सोयाबीन एकरी 8 ते 9 क्विंटल येत असतो.पण काही भागात यंदा चार ते पाच क्विंटल पर्यंत खाली आला. तर भागात एकरी 2 ते 3 क्विंटलने उत्पादन घटले. राजस्थान महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश तिन्ही महत्त्वाचे सोयाबीन अग्रेसर असणारे राज्य आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना रा यंदा पिकाला फटका बसला. यामुळे देशाचे उत्पादनात कमी राहण्याची शक्यता आहे.
खाद्यतेल आयतीचा दबाव
आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सोयाबीनचे भाव नरमलेले आहेत. म्हणजेच सोया तेलाचे आणि सोयापेंड भावही कमीच आहेत. या काळात सरकार देशातील सोयाबीन उत्पादकांना संरक्षण देण्यासाठी खाद्यतेल आयात कमी करून भावाला आधार देणे आवश्यक होते.
पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे भाव कमी झाल्यानंतर सरकारने आयात शुल्क कमी करून खाद्यतेल्याचे भाव पाडले त्यामुळे सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करावी अशी मागणी केली जात आहे.
हे पण बघा :
कांद्यानंतर झेंडूचे भाव घसरले, असा झालाय परिणाम
Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढणार का ? पुढील काही दिवसात पाऊस पडेल का?
अन्नधान्य उत्पादन मध्ये विक्रमी वाढ
