वातावरणात सतत होणाऱ्या बदलामुळे सिताफळ बागांना फटका
ऑक्टोबर २४, २०२३वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे सीताफळ हंगाम हा मागे पुढे झालेला आहे. आतापर्यंत 30 ते 40 टक्के फळ विक्री झालेली आहे. आठवड्यात सर्व भागांमधून सीताफळ निघायला सुरुवात होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मागच्या काही एक-दोन वर्षात सिताफळ लागवडीकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले गेलेले आहे. दरवर्षी पेक्षा क्षेत्र मध्ये वाढ झालेली आहे. राज्यात एक लाख हेक्टर पेक्षा अधिक लागवड क्षेत्र झालेले आहे.
दसरा दिवाळी या काळात सिताफळाचा हंगाम सगळीकडे जोरदार असतो. पण यावर्षी असंतुलित वातावरण मुळे, याचा फटका सिताफळ बागांनाही बसला. उन्हाळ्यात पाणी देऊन सिताफळ बागाचे नियोजन केलेल्या शेतकऱ्यांचे ठिकठिकाणी फळे विकून झालेले आहेत. आता मात्र नियमित बहर फुटलेल्या बागांमधील सीताफळ विक्रीसाठी तयार होत आहे.
आठवड्यात या भागांमध्ये सर्व फळे विक्रीला येत असतील. दुसऱ्या काही भागातील विक्री सुद्धा सुरू झालेले आहे. चांगल्या दर्जाची फळे पहिल्यांदा 100 ते 120 रुपयांची विकलेली गेली आहे. सुद्धा 70 ते 80 रु किलो दर मिळत आहे. तर दुय्यम फळे 40 ते 50 रुपये विकली जात आहे असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. यंदा दर्जेदार फळांचे प्रमाण व संख्या बागांमध्ये कमी असल्याचेही. शेतकरी सांगत आहे.
या वर्षी मागील काही दिवसांपासून पाण्याची समस्या होत आहे त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. याचा फटका सीताफळ बागेला बसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे संकट वाढले आहे. तसेच या वर्षी मागील वर्षाच्या तुलनेत उत्पन्नात कमी झाली आहे. अशा स्थितीत पुढील काही दिवसांत सीताफळ दरात कसा बदल होईल याकडे सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
