देशात अन्नधान्यात व फुलउत्पादनात विक्रमी वाढ

 केंद्रीय कृषी विभागाच्या 2022 -23 वर्षाच्या आघाड्यानुसार यावर्षी अन्नधान्य व फुलोउत्पादन मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2022-23 मधील चांगल्या मान्सून हंगामानंतर अन्नधान्य फुलउत्पादन पिके विक्रम स्थापित करणार आहे असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

 कृषी विभागाच्या माहितीनुसार  असे समोर येत आहे की फळे भाजीपाला लागवड पिके, फळभाज्या फुले मध उत्पादनात वाढीचे अपेक्षा आहे.

 अन्नधान्य  ३३० दशलक्ष, तर फलोत्पादन ३५२ दशलक्ष टनापर्यंत पोचणार आहे. फलोत्पादनात २०२२-२३ यावर्षी सुमारे ४.७४ दशलक्ष टन १.३७ टक्के) वाढ होऊन ते विक्रमी २५१.९२दशलक्ष टनापर्यंत पोचणार असल्याचे केंद्रीय कृषी विभागाच्या माहितीतून समोर आले आहे.

कडधान्य, फ्लावर, फळे

अन्नधान्य उत्पादनात मागच्या  वर्षापेक्षा  या वर्षी ज्यादा उत्पादनात वाढ होईल असे केंद्र सरकारचे मत आहे.अन्नधान्याबरोबरच फलोत्पादनात गेल्यावर्षी विक्रमी उत्पादन झाले आहे.

आपल्या शेतकऱ्यांच्या कष्ट, शास्त्रज्ञांची कार्यक्षमता आणि  केंद्र सरकारची शेतकरी हिताची धोरणे यांचे चांगले फळ आहे. असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे म्हणणे आहे.