Onion : कांद्याचे दर घसरणार ? शेतकऱ्यांना फटका बसणार, सरकारने घेतला हा मोठा निर्णय....

 Onion Market News : यंदाचा दसरा सण हा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप खास ठरला आहे. विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातील काही बाजारपेठेत लाल कांद्याला चांगला विक्रमी भाव मिळाला आहे. त्या कांद्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मात्र कांद्याचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

देशात कांद्याच्या दरात 57 टक्कांची वाढ झाल्याचा अहवाल एका दिवसापूर्वी आला होता. यावर्षी कांद्याचे दर 30 रुपये होता भावा आता 47 रुपये किलोवर गेला आहे. दरम्यान या कांद्याच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने काम सुरू केले आहे कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Onion


सरकार ही पावले उचलणार

देश पातळीवर कांद्याच्या दरात सरासरी 57%वाढ झाली आहे. सध्या कांद्याचे भाव प्रति किलो 47 रुपये आहे. त्यामुळे कांद्याच्या किंमती कमी करण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेतला आहे. बफर स्ट्रोक मधून कांद्याची किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दाराने विक्री करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे ग्राहकांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ज्या ठिकाणी कांद्याचे दर वाढले आहे तेथे घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही बाजारांमध्ये बफर स्टॉकमधून कांद्याचा पुरवठा केला जाणार आहे. ऑगस्ट महिन्यापासून 22 राज्यातील विविध ठिकाणी सुमारे 1.7लाख टन कांद्याचा स्टॉक मधून पुरवठा करण्यात आला.

किरकोळ बाजारात, नॅशनल कन्झ्युमर को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) आणि नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) या दोन सहकारी संस्थांच्या माध्यमातून बफर स्टॉकमधील कांदे प्रति किलो 25 रुपये या सवलतीच्या दराने विकले जात आहेत. दिल्लीतसुद्दा बफर स्टॉकमधील कांदा सवलतीच्या दराने विकला जात आहे.त्यामुळे कांदाचे दर कमी होऊ शकतो असा अंदाज आहे.


कांद्याचे भाव का वाढले?

 मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी खरीप कांद्यांच्या पेरणीला उशीर झाल्यामुळे व हवामानाशी संबंधित कारणामुळे खरीप कांद्याला उशीर झाला. सध्या खरीप कांद्याची आवक सुरू व्हायला हवी होती मात्र ते झाले नसल्यामुळे कांद्याच्या भावामध्ये वाढ झाली आहे ही माहिती अधिकाऱ्याने दिली. साठवलेला रब्बी कांदा संपल्याने आणि खरीप कांद्याची आवक झाल्यामुळे पुरवठ्याची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे आणि घाऊक किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढले आहेत.

सरकारने केला दुप्पट बफर स्टॉक

 सरकारने चालू वर्ष 2023-24 मध्ये कांद्याचा स्टॉक दुप्पट केला आहे. त्यामुळे देशांतर्गत उपलब्धता सुधारेल आगामी काळात वाढत्या किमतीला आळा बसेल. या आर्थिक वर्षात ग्राहक व्यवहार मंत्रालयाने NCCF आणि NAFED मार्फत पाच लाख टनांचा बफर स्टॉक ठेवला आहे. येत्या काही दिवसात अजून दोन लाख टन कांदा खरेदी करण्याची योजना आहे. दरम्यान या कांद्याच्या भाववाढीचा फटका सरकारला बसू नये आणि सर्वसामान्य नागरिक आक्रमक होऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे.

हे पण बघा

महाराष्ट्र महा सन्मान शेतकरी निधी योजना : पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात

Soybean Market : सोयाबीनचे भाव आजही हमीभावपेक्षा कमीच.

अन्नधान्य उत्पादन मध्ये विक्रमी वाढ

कांद्यानंतर झेंडूचे भाव घसरले, असा झालाय परिणाम