आता विहीर खुदाई साठी मिळणार चार लाख रुपये, जाणून घ्या कसा करायचा आहे अर्ज

 महाराष्ट्रातील बागायती क्षेत्र वाढवण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी पावले उचलली जातात व विविध योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक क्षेत्र ओलीताखाली आणण्याचा प्रयत्न केला जातो याच सर्व योजनांपैकी एक आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच MGNREGA. आता संबंधित योजनेच्या माध्यमातून सिंचन अनुदानामध्ये वाढ करून चार लाखांपर्यंत करण्यात आले आहे हे विहिरीसाठीचे अनुदान आधी तीन लाख रुपये होते.

आता दोन सिंचन विहिरी मधील अंतराची अट देखील रद्द करण्यात आलेले आहेत त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना विहीर खोदता येईल व विहीर सिंचनाचा उपयोग करता येईल. संबंधित योजनेतील बदलामुळे शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.

मनरेगा विहीर योजना


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विहीर खोदण्यासाठी संबंधित उमेदवार हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच भटक्या आणि विमुक्त जातीतील असणे गरजेचे आहे. याचबरोबर स्त्री-कर्ता असलेले कुटुंब, दारिद्र्यरेषेखाली लाभार्थी, जमीन सुधारणांचे लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

MGNREGA योजनेअंतर्गत विहीर खोदण्यासाठी संबंधित उमेदवाराला ग्रामपंचायत मध्ये अर्ज दाखल करावा लागेल व त्याबरोबर ७/१२ तसेच ८ अ चा उतारा जॉब कार्डचे प्रत व इतर संबंधित दस्तावेज सादर करावे लागतील. मनरेगा च्या माध्यमातून विहीर खोदण्यासाठी तुम्हाला विहीर खुदाईचा खर्च तसेच सिंचनासाठीचा संबंधित खर्च दिला जातो ज्यामध्ये अधिकतम रक्कम ही चार लाख रुपये दिली जाते.

सध्या शेतकऱ्यांना शेती करत असताना सिंचन समस्येचा सामना करावा लागतो व बऱ्याच वेळेस अपुऱ्या सिंचन व्यवस्थेमुळे शेतीच्या उत्पादनावर ती मोठा परिणाम होतो या सर्व बाबी लक्षात घेता मनरेगा च्या माध्यमातून विहीर खुदाई करणे शेतकऱ्यांसाठी आधार देऊ शकते. तसेच मनरेगा च्या माध्यमातून विहीर खुदाई योजनेच्या कार्यक्षमतेवरती लक्ष देणे गरजेचे ठरते. 

हे पण वाचा:

1. शासनाच्या या निर्णयामुळे घसरतील कांद्याचे भाव

2. शेतकरी महासन्माननीधी योजनेचा या जिल्ह्याला मिळालाय सर्वाधिक निधी

3. या कारणामुळे तापमान आणखीन घसरण्याची शक्यता