महाराष्ट्र महा सन्मान शेतकरी निधी योजना : पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ; कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळाला

Namo Shetkari Yojana : शेतकरी महासन्मान निधी योजना ही शिंदे सरकारने सुरु केली असून ही एक महत्वकांशी योजना आहे. या योजनेची घोषणा 2023-24 मध्ये करण्यात आली होती. ही योजना पीएम किसान योजनेअंतर्गत करण्यात आली आहे.

या योजनेचे स्वरूप पी एम किसान योजनेप्रमाणेच आहे. या योजनेचा निकष देखील पीएम किसान प्रमाणेच आहे. जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरले आहेत त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे नवीन योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचे तीन हप्त्यात विभाजन केलेले आहे एका हप्त्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

Kisan Yojana


अर्थातच राज्यातील शेतकऱ्यांना नमो योजनेअंतर्गत 6000 आणि पीएम किसान चे 6000 रुपये असे एकूण 12 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ देखील झाला आहे. योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला आहे.या योजनेची घोषणा झाल्यानंतर या योजनेचा पहिला हप्ता केव्हा मिळणार प्रश्न शेतकऱ्यांकडून सातत्याने उपस्थित केला जात होता.

पण काल अखेर शेतकऱ्यांची ही आतुरता संपली आहे. काल अर्थातच 26 ऑक्टोबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. शिर्डी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये पीएम मोदी यांनी एक बटन दाबून राज्यातील 86 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा केला आहे.

नमो शेतकरी योजनेच्या अत्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार असे लक्षात आले की नमो शेतकरी महासम्मान योजनेचा जी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. त्यात सर्वाधिक लाभ हा मराठवाडा आणि विदर्भाला मिळालेला आहे. या योजनेच्या कोकणातील जिल्ह्यातील सर्वाधिक कमी लाभ मिळाला आहे. मराठवाड्यातील विचार केला असता मराठवाड्यातील बीड जिल्ह्याला सर्वाधिक लाभ मिळाला आहे.

जिल्ह्याचा विचार केला असता अहमदनगर जिल्ह्याला पहिल्या हप्त्यापोटी निधी मिळाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लाभार्थीची संख्या ही पाच लाख 17 हजार 611 एवढी आहे. पहिल्या हफ्त्यापोटी कोणत्या जिल्हाला किती निधी मिळाला आहे हे जाणून घ्या.

हाती आलेल्या माहितीनुसार, अहमदनगर १०३.५२ कोटी, अकोला ३७.५६ कोटी, अमरावती ५३.१८ कोटी, छत्रपती संभाजीनगर ६५.३७ कोटी नांदेड ७५.४८ कोटी, नंदुरबार २९.३२ कोटी, नाशिक ७७.०७ कोटी, धाराशिव ४२.२८ कोटी, पालघर १६.०७ कोटी, परभणी ५३.४२ कोटी, पुणे ७७.९७ कोटी, रायगड १९.६५ कोटी, रत्नागिरी २५.५२ कोटी, सांगली ७७.४४ कोटी, सातारा ७८.६७ कोटी, सिंधुदुर्ग २१.६२ कोटी, सोलापूर १०.८१ कोटी, ठाणे १३.६७ कोटी, वर्धा २४.६८ कोटी, वाशिम ३०.८१ कोटी, यवतमाळ ५५.४३बीड ७७.९१ कोटी, भंडारा ३७.२१ कोटी, बुलडाणा ६६.३८ कोटी, चंद्रपूर ४३. ३२ कोटी, धुळे २८.४९ कोटी, गडचिरोली २५. ९३ कोटी, गोंदिया ४२.४८ कोटी, हिंगोली ३६.१२ कोटी, जळगाव ७५.९१ कोटी, जालना ५७.९५ कोटी, कोल्हापूर ८१.२५ कोटी, लातूर ५३.४६ कोटी, नागपूर ३०.०८ कोटीकोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे....

हे पण बघा :

कांद्यानंतर झेंडूचे भाव घसरले, असा झालाय परिणाम 

राज्यात थंडीचा तडाखा कधी वाढणार