आनंदाची बातमी, या तारखेला मिळणार शेतकरी महासन्मान निधीचे 2 हजार रुपये
ऑक्टोबर ११, २०२३नमो शेतकरी महा सन्मान नीधीचा पहिला फक्त दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाण्याचे शक्यता आहे ही योजना पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे.
15 ऑक्टोबर पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महा सन्मान योजनेचे पैसे टाकले जाऊ शकतात. संबंधित योजनेचा पहिला हप्ता देण्यासाठी राज्य सरकारकडून 1 हजार 720 कोटी ची तरतूद करण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली
नमो शेतकरी महासन्मान निधी ची माहिती वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत 2023 24 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देण्यात आली होती. सध्या शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचे सहा हजार रुपये केंद्र सरकार मार्फत वितरित करण्यात येतात यातच नमो शेतकरी महासन्मान निधी मार्फत अतिरिक्त सहा हजार रुपये प्रतिवर्षी देण्यात येणार आहे.
पीएफएमएस प्रणालीच्या मदतीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संबंधित रक्कम पाठवले जाईल त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल. महाराष्ट्र राज्यातील 85 लाख 60 हजार पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. जलद गतीने तांत्रिक कारवाई पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जातील अशी ग्वाही कृषिमंत्री मुंडे यांनी दिली.
सध्या महाराष्ट्र राज्यात काही भागांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या पावसाच्या खंडामध्ये खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशातच राज्य सरकार मार्फत चालवण्यात येणाऱ्या या योजनेचे शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
