मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात, या तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून जाणार

 महाराष्ट्र राज्य मधून पाच ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान परतीच्या पावसाला सुरुवात होईल याआधी रविवार पर्यंत महाराष्ट्रात चांगला पाऊस चालू होता परंतु रविवारपासून पावसाचा जोर कमी झालेला आहे व बहुतांश भागांमधून पावसाने माघार घेतलेली आहे. फक्त कोकण विभागामध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हवामान विभागानुसार 25 सप्टेंबर पासून मान्सूनच्या परतीच्या पावसाला सुरुवात होईल असे भाकित वर्तवण्यात आले होते त्यानुसार रविवारपासून अनेक भागांमधून मान्सून ने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये हिमाचल प्रदेश, लढाख, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, तसेच उत्तर प्रदेशच्या काही भागांमधून मान्सून ने परतीचा प्रवास सुरू केला आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील देखील पाच ऑक्टोबर नंतर मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल. 

Monsoon return date maharashtra

 हवामान विभागानुसार पुढील दोन दिवसांमध्ये गुजरात राज्यातून मान्सून परतीला लागेल व 12 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातून जवळपास सर्वच भागातून मान्सून परतीला लागेल.

 पुढील दोन दिवसांमध्ये विदर्भात हलका पावसाची शक्यता आहे तसेच मराठवाड्यात कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. चार ऑक्टोबर पर्यंत मध्य महाराष्ट्रात हलका पावसाची शक्यता आहे आणि कोकण तसेच घाटमाथ्यावर 8 ऑक्टोबर पर्यंत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात 6 ऑक्टोबर नंतर बहुतांश भागांमध्ये कोरडे हवामान बघायला मिळेल.

हे वाचा : सुधारित सोयाबीन लागवड तंत्रज्ञान 

सप्टेंबर महिन्यामध्ये पडलेल्या पावसामुळे तसेच ऑक्टोबर च्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये पडलेला पावसामुळे धरणांची पातळी काहीशी वाढण्यास मदत झाली आहे व महाराष्ट्र वरील दुष्काळाचे संकट काही प्रमाणात कमी झालेले आहे. परंतु ऑगस्ट महिन्यातील पावसाचा खंड तसेच अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.