जोरदार पावसाचा इशारा, कोकणाला रेड अलर्ट; या जिल्ह्यांत जोरदार पाऊस
ऑक्टोबर ०१, २०२३अरबी समुद्रालगत महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यालगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र रत्नागिरी आणि पणजी लगत समुद्र किनाऱ्याला धडकून आपला परिणाम दाखवण्याची शक्यता आहे. या वातावरणाच्या प्रणालीमुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच कोल्हापूर लगत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. संबंधित भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
उर्वरित महाराष्ट्र मध्ये देखील ठिकठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे दक्षिण कोकण तसेच घाटमाथ्याच्या परिसरावर ठिकठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. आज दक्षिण मध्य महाराष्ट्र मध्ये देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागांमध्ये ताशी 55 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे तसेच समुद्र खवळून उंच लाटा निर्माण होऊ शकतात. महाराष्ट्र आणि गोव्यालगत समुद्र मध्ये मासेमारीसाठी न जाण्यासाठी इशारा मच्छीमारांना देण्यात आलेला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. रत्नागिरी आणि सातारा मध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे याच बरोबर कोल्हापूर मध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
