टोमॅटो कांद्यानंतर आता झेंडू रस्त्यावर फेकण्याची शेतकऱ्यांवर वेळ अचानक दर कमी झाल्याने शेतकरी चिंतेत

 कोणताही सण असो की आनंद भरण्यासाठी आपण झेंडूची फुलांची आपल्याला गरज असते. परंतु झेंडूचे फुले बाजारात येईपर्यंत शेतकरी प्रचंड राबराब राबतो. दोन महिन्यानंतर झेंडूची फुले काढणीला सुरुवात होते. यंदा दसऱ्यात भाव नसल्यामुळे शेतकरी मात्र नाराज झालेला आहे. महाराष्ट्रातील सर्वच बाजारपेठांमध्ये झेंडूचा दर 40 ते 50 रुपये किलो असा आहे. कमी दर असल्यामुळे शेतकऱ्यांना झेंडू फेकून देण्याची वेळ आली आहे.

 राज्यात टोमॅटो कांदा आणि फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठे संकट आले आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत फुलांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे परंतु बाजारपेठेमध्ये झेंडूला दर नसल्यामुळे शेतकऱ्यांना फुले फेकून द्यायची वेळ आली आहे.

zendu image


 यावर्षी झेंडूच्या फुलाचे भाव घसरल्यामुळे व उन्हाचा फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे नुकसान सहन करावे लागले. उत्पादन ज्यादा प्रमाणात व ग्राहकांची कमी प्रमाणात असलेल्या मागणीमुळे फुले फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याचे चित्र राज्यातील अनेक बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे.

 दसरा सण असला की घर दुकान व वाहनांवर फुलांचे तोरण लावावे यासाठी शेतकरी तीन महिने शेतात दिवस-रात्र कष्ट घेतात.पण एन वेळी झेंडूच्या फुलाचे दर पडल्याने प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळे स्वतः शेतकऱ्यांनी फुलांची विक्री करण्याची वेळ आली आहे.

 मागच्या वर्षी दसऱ्याला 150 ते 200 रुपये किलो असा झेंडूचा भाव मिळाला होता. यावर्षी उत्पादन जास्त असल्यामुळे भाव कोसळून 40 ते 50 रुपये किलो झाला आहेत. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे फुले लवकर कोमजून जात आहे. दर नसल्याने अनेक शेतकरी सहकुटुंब फुलांची विक्री करताना दिसत आहे.

 तर व्यापाऱ्यांना फुले देण्यापेक्षा स्वतः विक्री केल्यास अधिक फायदा होतो. यावर्षी दसरा व दिवाळी शेतकरी फुल विक्री करताना दिसेल असे चित्र दिसत आहे त्यामुळे शेतकरी नाराज झालेले आहे.तरी सरकार शेतकऱ्यांना काय मदत करते याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

हे पण बघा: 

टोमॅटो दरात घसरण

अन्नधान्य उत्पादन मध्ये विक्रमी वाढ 

या तारखेला मिळणार नमो योजनेचा पहिला हफ्ता