गहू लागवड साठी या जातींची निवड करा, भरघोस उत्पादन आणि नफा मिळवा
सप्टेंबर ३०, २०२३भारतीय अन्नपदार्थांमध्ये गव्हाचे विशेष स्थान आहे विशेषता उत्तर भारतामध्ये चपाती, ब्रेड तसेच वेगवेगळ्या कारणांसाठी दररोज गव्हाचा उपयोग केला जातो. जगातील प्रमुख गहू उत्पादकांमध्ये भारत देश देखील सामील आहे. म्हणूनच आजच्या लेखात आपण गव्हाचे चांगले उत्पन्न देणाऱ्या गव्हाच्या जातींविषयी जाणून घेऊया.
गव्हाची चांगली व्हरायटी निवडत असताना संबंधित गव्हाची व्हरायटी ही रोगप्रतिकारक असली पाहिजे तसेच उत्तम दर्जाच्या गहू सह उत्पादनामध्ये वाढ झाली तरच गहू शेतीतून चांगला नफा कमवता येतो. आपण या लेखात सांगत असलेल्या व्हरायटी या गहू आणि बार्ली संशोधन केंद्र मार्फत निर्माण करण्यात आलेला आहे व त्याला आयसीएआर चे मानांकन प्राप्त झालेले आहे.
DBW-370, DBW-371 आणि DBW-372 या जातींची उत्पन्न क्षमता आणि उत्पादकता आधारावरती ICAR कडून शिफारस करण्यात आलेले आहे. संबंधित गहू वरायटी काही विशिष्ट भागांसाठी अधिक चांगले परिणाम देत असल्याचे संशोधनात पुढे आले आहे.
DBW-370 ही एक चांगली उत्पन्न देणारी अर्ध-बौने स्वरूपाची गव्हाची जात आहे. गव्हापासून उत्तम दर्जाचे वेगवेगळे पदार्थ तसेच चपात्या बनवण्यासाठी संबंधित वरायटी उपयुक्त ठरते. गहू वाढीच्या वेळेस अनुकूल परिस्थितीमध्येही या व्हरायटीमुळे चांगले उत्पन्न घेणे शक्य होते. हरियाणा मध्ये तसेच उत्तर भारताच्या इतर राज्यांमध्ये संबंधित गव्हाची लागवड केली जाते.
बागायती भागांमध्ये लागवडीसाठी DBW-371 या गव्हाच्या जातीचा उपयोग होतो. महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, पंजाब तसेच हरियाणा मध्ये संबंधित जातीच्या व्हरायटीची लागवड केली जाऊ शकते DBW-371 जातीच्या व्हरायटीमुळे 75 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळणे शक्य होते. या जातीची व्हरायटी 150 दिवसांमध्ये परिपक्व होते.
DBW-372 जातीची व्हरायटी 151 दिवसांमध्ये परिपक्व होते. या जातीच्या व्हरायटीमुळे सरासरी 75.3 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळणे शक्य होते. कर्नाल येथील गव्हाच्या शास्त्रज्ञांनी संबंधित जातीच्या वरायटीचा शोध लावलेला आहे. वरील नमूद केलेल्या गव्हाच्या जातींव्यतिरिक्त अनेक प्रकारच्या गव्हाची लागवड महाराष्ट्रात केली जाते मुख्यता वातावरण तसेच भौगोलिक परिस्थितीनुसार गव्हाच्या वाणाची निवड केली तर अधिक चांगला नफा मिळवता येतो.
हे पण बघा:
1. पालक लागवडीसाठी सर्वोत्तम वरायटी
