Tur Management: तुर पिकाच्या महत्त्वाच्या किडींचे एकात्मिक व्यवस्थापन
सप्टेंबर २७, २०२३महाराष्ट्रातील प्रमुख डाळवर्गीय पिकांमध्ये तुरीकडे बघितले जाते. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तुरीचे क्षेत्र आहे व या तुरीवर किडींच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्नामध्ये घट होते प्रामुख्याने फुल आणि शेंगांमधील किडीचा डायरेक्ट परिणाम हा उत्पादनावरती दिसून येतो म्हणूनच आजच्या लेखात आपण तुर पिकाच्या महत्त्वाच्या किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करायला शिकूया.
पिकामधील कीड ही मुख्यतः फुल व शेंगांवर परिणाम करते त्यामुळे संबंधित केलेला वेळीच आळा घातला नाही तर 70% पर्यंत नुकसान बघायला मिळते. माशीची अळी, हिरवे घाटाची अळी तसेच पिसारी पतंगाची अळी या अळी तुरीच्या शेंगांवर परिणाम करत असतात.
जेव्हा आपण तुरीच्या शेंगा धरतो तेव्हापासून आपण अळीचे नियंत्रण करणे महत्त्वाचे ठरते. ढगाळ वातावरणात डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये हिरवे घाटाची अळी बघायला मिळते. या अळी तुरीच्या शेंगा पोखरतात व त्यामध्ये जाऊन तुरीचे दाणे खातात त्यामुळे तुरीच्या उत्पादनावर मोठा परिणाम होतो.
पिसारी पतंगाची अळी देखील तुरीच्या शेंगांवरती परिणाम करत असते व या अळीमुळे तुरीच्या शेंगा खरडून बाहेरच्या बाजूने राहून तुरीचे दाणे खाल्ल्याने तुरीचे नुकसान होते. याच प्रमाणे माशीची अळी देखील तुरीच्या शेंगांची मोठ्या प्रमाणात नुकसान करत असते.
तुरीच्या शेंगांच्या अळीचे एकात्मिक व्यवस्थापन
1. 20 पक्षी थांबे प्रति हेक्टर उभारावेत
2. निम ऑइल किंवा निंबोळी अर्क चा फवारा प्रथम फुलोरा लग्नाच्या कालावधीमध्ये व त्यानंतर शेंगा भरण्याच्या कालावधीमध्ये मारावा ज्यामुळे निम मधील अझाडेरेक्टिन नावाचे केमिकल मुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव कमी होतो.
3. अळी प्रादुर्भावित झाडांवरील अळी लागलेल्या शेंगा गोळा करून नष्ट कराव्यात.
4. रासायनिक नियंत्रण मध्ये आपण लांम्बडासायहॅलोथ्रीन किंवा एमामेक्टिन बेंजोएट या रासायनिक कीटकनाशकांचा उपयोग करू शकतो.
हे पण वाचा:
1. सुधारित सोयाबीन लागवड तंत्रज्ञान
2. कपाशीच्या फांद्यांची वाढ अशी करा नियंत्रित
