Tomato rate update: टोमॅटो दर पडलेत, कधी होईल टोमॅटो दरात सुधारणा
सप्टेंबर २९, २०२३सध्या टोमॅटोचे बाजार भाव अत्यंत दबावत आहेत पुढील काही दिवसांमध्ये टोमॅटो भाव मध्ये काय परिणाम होतील. टोमॅटोचे बाजार भाव वाढू शकतात की नाही तसेच किती दिवस टोमॅटोची परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे याविषयी आजच्या या लेखांमध्ये जाणून घेऊया त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा.
सध्या टोमॅटोला पावसाचा जोरदार फटका देखील बसलेला आहे परंतु तरीही टोमॅटोचे बाजार भाव येईल एक रुपये प्रति किलो म्हणजेच शंभर रुपये क्विंटल या प्रमाणामध्ये बाजारात उपलब्ध आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फार जास्त तोटा सहन करावा लागत आहे. मागच्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे टोमॅटोचा उत्पादन खर्च वाढलेला आहे परंतु भावामध्ये वाढ झालेली नाही
टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आवक वाढलेले आहे त्यामुळे टोमॅटो बाजारभावावरती परिणाम झालेला असल्याचे टोमॅटो व्यापाऱ्यांनी नमूद केले आहे. सरकारच्या धोरणांचा अप्रत्यक्ष दबाव बाजारावरती आहे तसेच सरकार टोमॅटो बाजारभाव वाढवू न देण्यासाठी प्रयत्नशील आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
महिन्यामध्ये पडलेला पावसाचा खंड आणि अनियमित पडत असलेला पाऊस त्यामुळे टोमॅटो उत्पादनावर परिणाम होत आहे तसेच टोमॅटोचा उत्पादन खर्च वाढलेला आहे. परंतु तरीही अजूनही टोमॅटो बाजारात पुढील काही दिवस टोमॅटोतील आवक कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे बाजार भाव नरमलेले असतील परंतु त्यानंतर टोमॅटो दरात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
हे पण वाचा: पुढील 24 तासात या जिल्ह्यात पडणार पाऊस
