महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा येथे पडू शकतो धुंवाधार पाऊस

Rain update: महाराष्ट्र राज्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस होऊ शकतो असे भाकीत हवामान अंदाज वर्तवणाऱ्या सतर्क या हवामान अंदाज संस्थेमार्फत देण्यात आलेले आहे. आज महाराष्ट्रातील घाटामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे व घाटांमधून प्रवास करताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

सतर्क हवामान अंदाज संस्थेतर्फे मिळालेल्या हवामान अंदाजानुसार आज महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, अहमदनगर, ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर येथील काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचे पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मान्सून ने परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. 

Rain update


आज पुणे विभागातील मावळ, जुन्नर आंबेगाव येथे काही भागांत ढगफुटी सदृश्य पाऊस होऊ शकतो. मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचा तसेच दगड माती कोसळून अपघात होण्याचा धोका असतो म्हणूनच आज घाटांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे व प्रवास करत असताना अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कालपासून देशातून मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. नैऋत्य राजस्थान मधून हा मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला व पाच ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातून देखील मान्सून परतीच्या प्रवासाला लागण्याची शक्यता आहे यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत उशिरा मान्सून परतला लागला त्यामुळे पीक कापणीच्या वेळेस होणाऱ्या पावसामुळे पिकांना धोका होण्याची भीती सतावत आहे.