या 16 जिल्ह्यात पुढील तीन दिवसात जोरदार पाऊस, हवामान विभाग अंदाज
सप्टेंबर २५, २०२३IMD update: आज महाराष्ट्रात जरी ठिकठिकाणी सावलीचा खेळ चालू असला तरी मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्र राज्य मध्ये चांगला जोरदार पाऊस पडला होता व त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वातावरणाच्या परिस्थितीचा अभ्यास करून हवामान विभागाकडून नवीन हवामान अंदाज देण्यात आलेला आहे.
पुढील तीन दिवसांसाठी महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
आज देखील महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, आणि खानदेशातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र मधील अहमदनगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यामध्ये, कोकण विभागातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव तर खानदेशातील जळगाव जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, नागपूर या सर्व जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता.
उद्या आणि परवा देखील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे त्यामुळे धरणांची पातळी भरण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्याची पावसाची सप्टेंबर महिन्यामध्ये भरून निघावे अशी आशा व्यक्त होत आहे व्यक्त होत आहे.
