पुंगनूर छोट्या गाई विषयी संपूर्ण माहिती, कुठे खरेदी कराल आणि गुणधर्म
सप्टेंबर २७, २०२३punganur cow: सध्या विविध सोशल मीडिया वरती छोट्या गाईंचा व्हिडिओ व्हायरल होत आहेत व ते व्हिडिओ पाहून आपल्याला प्रश्न पडू शकतो की या काही खरच अस्तित्वात आहेत का किंवा जर अस्तित्वात असतील तर त्यांचा काय गुणधर्म आहे त्यांचे काय नाव आहे. म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण त्या छोट्या पुंगनूर गाई विषयी माहिती जाणून घेऊया.
पुंगनूर गाई विषयी सांगायचे झाले तर ही जगातील सर्वात छोटी काय म्हणून ओळखली जाते या गायीची उंची ही 2.5 फूट ते 03 फुटांपर्यंत असते. छोटी उंची आणि लोभस रूपामुळे ही गाय पाळण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.
या गाई चा आकार लहान असल्यामुळे पुंगनूर गाय पाळण्यासाठी विशिष्ट गोठ्याची गरज लागत नाही आपण आपल्या अंगणात, गच्चीवर, पडवी मध्ये छोट्याशा जागेमध्ये देखील पुंगनूर गाईचे संगोपन करू शकतो. शहरांमध्ये देखील या गाईचे संगोपन केले जाऊ शकते व पुंगनूर गाईला आहार देखील कमी लागतो.
पुंगनूर गाईपासून एक ते दोन लिटर दूध प्राप्त केले जाऊ शकते. हि गाय कमी देत असली तरी औषधी गुणधर्मामुळे या दुधाला मागणी जास्त असते. तसेच पुंगनूर गाईंच्या दुधाला इतर गाईंच्या तुलनेत जास्त फॅट लागते.
हे पण वाचा: सुधारित सोयाबीन लागवड तंत्रज्ञान
पुंगनूर गाय मुख्यतः आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यामध्ये आढळते. देशभरातून पुंगनूर गायीच्या खरेदीसाठी लोक आंध्र प्रदेश येथे येत असतात. पुंगनूर गाईची अलीकडच्या काळात मागणी वाढलेली असली तरी ही गाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे व त्यामुळे आंध्रप्रदेश सरकारकडून संबंधित गायीच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
