कांदा बाजार भाव दबावांमध्ये पुढे काय होणार, कृषी बातमी
सप्टेंबर २६, २०२३Onion rate: सध्या महाराष्ट्र मधील कांदा बाजार भाव हा दबावात आहे व नाशिक जिल्ह्यामधील कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे कांद्याचे व्यापार ठप्प झाले आहेत. सध्या मार्केटमध्ये कांदा बाजारभावाची कोंडी बघायला मिळत आहे.
आधी कांदा मार्केट मध्ये कांद्याचे बाजार भाव हे 2500 रुपये होते परंतु त्यानंतर सरकारने कांदा निर्यातीवर लावलेल्या 40% शुल्कामुळे कांदा बाजार भाव मोठ्या प्रमाणात घसरले व 2500 रुपये वरून हे बाजार 1800 रुपयांपर्यंत आले त्यामुळे शेतकऱ्यांचे तसेच व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सरासरीचा विचार केला तर जवळपास 700 रुपयांनी कांद्याचे बाजार भाव कमी झाले आहेत. आधीच सरकारच्या धोरणामुळे कांदा बाजारभाव पडलेले असताना व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट ओढवले आहे. सरकारकडून लावण्यात आलेले चाळीस टक्के निर्यात शुल्क कमी करावे अशी कांदा व्यापाऱ्यांची मागणी आहे.
नाफेड करत असलेल्या कांदा खरेदी विक्रीवर कांदा व्यापाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे तसेच शेतकऱ्यांनी देखील नाफेड ने मार्केटमध्ये येऊन शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावा अशी मागणी केली आहे जेणेकरून कांदा बाजार भावाला काहीसा आधार मिळेल. नाशिक बाजार समितीमधील कांदा व्यापाऱ्यांनी संप पुकारलेला असला तरी इतर बाजारपेठेमध्ये कांद्याचे व्यवहार सुरू आहेत परंतु याचा फायदा कांदा व्यापारी घेताना बघायला मिळत आहेत व कांद्याचे भाव पडलेले आहेत.
मान्सून लागला प्रवासाला हे होतील बदल
सध्या मार्केटमध्ये कांद्याला सतराशे ते दोन हजार रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळत आहे बाजारभाव दबावात असली तरी पुढील काही काळामध्ये कांद्याची आवक कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे व त्यामुळे कांद्याचे बाजार भाव वाढू शकतात.
