सहा हजार हेक्टर क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
सप्टेंबर २७, २०२३मागील काही दिवसांपासून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ मध्ये चांगला जोरदार पाऊस चालू आहे व शनिवारी खानदेशामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले या जोरदार पावसामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली व जवळपास सहा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी खरीप पिकाची निराशा पडली आहे.
जळगाव धुळे आणि नंदुरबारच्या दहा तालुक्यांमध्ये 22 व 24 सप्टेंबरला अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडला व त्यामुळे मोठे नुकसान झाले कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यात 4335 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे यामध्ये पण सर्वाधिक नुकसान हे कापूस पिकाचे झाले आहेत. धरणगाव, पाचोरा, पाचोळा, चोपडा, भडगाव, एरंडोल या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला होता. १२४ गावांमधील 6641 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना संबंधित जिल्ह्यात परिणाम झाला आहे.
यामध्ये 3221 हेक्टर कापसाचे नुकसान झाले तर मकाचे 525 हेक्टर आणि सोयाबीनचे 268 हेक्टर क्षेत्र बाधित झाले तसेच 167 हेक्टर क्षेत्रावरील ज्वारीला परिणाम झाला याचबरोबर इतर पिकांना देखील मोठा फटका बसला आहे संबंधित जिल्ह्यांमध्ये धरणगाव तालुक्यात जोरदार पावसामुळे सर्वात जास्त २७८५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये 600 हेक्टर तर धुळ्यामध्ये बाराशे हेक्टर क्षेत्रावर अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला काही काही गावांमध्ये तर सुपीक जमीन वाहून गेल्यामुळे पुढील काही वर्षे चांगले पीक येणार की नाही याची देखील शंका उपस्थित होत आहे. त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला नसला तरी कापसाची बोंडे होऊन त्यांचा दर्जा घसरला आहे.
मागच्या आठवड्यापासून खानदेशामध्ये पावसाची सरासरी वाढवून 93% पर्यंत पाऊस झालेला आहे तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये 92 टक्के पावसाची नोंद झाली आहे वाढलेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील धरणांची परिस्थिती चांगली झाली आहे व धरणाची पातळी सुधारलेले आहे.
हे पण वाचा: टोमॅटोच्या बाजारात कधी होणार सुधारणा
