IMD alert: तीन-चार दिवस पाऊस, आज या 16 जिल्ह्यांत पडणार मुसळधार पाऊस

IMD update: सप्टेंबर महिन्यामध्ये मध्यंतरीच्या काळात पावसाने खंड घेतला होता परंतु आता परत एकदा पावसाला सुरुवात झाली आहे व मागील दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे पुढील तीन-चार दिवस महाराष्ट्रात असाच पाऊस राहण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितलेली आहे.

आज कोकणातील काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकणामध्ये ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, मुंबई या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस शक्यता वर्तवण्यात आली आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळू शकतो. 

IMD alert


आज पुणे विभागामधील सातारा, पुणे, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचे हवामान वृत्त आहे. त्यामुळे संबंधित भागातील लोकांनी सतर्क राहावे असा इशारा देण्यात आलेला आहे. मराठवाड्यामध्ये परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तर छत्रपती संभाजी नगर , जालना या मध्यम पावसाचा हवामान अंदाज आहे.

विदर्भातील काही जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील वर्धा, वाशिम, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्‍यता आहे याचबरोबर भंडारा, अकोला, अमरावती या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे त्यामुळे संबंधित जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.