पुढील 48 तासांमध्ये फक्त या भागांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभाग अंदाज
सप्टेंबर २९, २०२३आज महाराष्ट्रातील कोकण आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागामार्फत देण्यात आलेला आहे. पूर्व विदर्भापासून दक्षिण कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे त्यामुळे संबंधित भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर पुढच्या दोन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे.
पुढील 24 तासांमध्ये विदर्भाचे क्षेत्र वगळले तर इतर सर्व भागांमध्ये ठिकठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.
आज कोकण गोवा तसेच मध्ये महाराष्ट्राचा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परंतु सातारा, सांगली तसेच कोल्हापूरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता काहीच कमी आहे. मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी भाग बदलत पाऊस पडू शकतो. पश्चिम महाराष्ट्र मध्ये अहमदनगर तसेच पुण्यामध्ये बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावले आहे परंतु ज्या भागांमध्ये पाऊस झालेला नाही त्या ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.
हे पण बघा: कमी खर्चात मुरघास बनवण्याची पद्धती
यावर्षी दरवर्षीच्या तुलनेमध्ये कमी पाऊस झालेला आहे त्यामुळे दुष्काळाचे सावट आहे हवामान विभागाच्या सॅटॅलाइट इमेज नुसार मुंबई तसेच आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळाले त्याचबरोबर मध्य भारत आणि दक्षिण भारतामध्ये पण ढगाळ परिस्थिती दिसली.
पुढच्या 72 तास नंतर पाऊस तीव्रता कमी होणार आहे परंतु पुढच्या 48 तासात मध्य महाराष्ट्र तसेच कोकणपट्ट्यामध्ये पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. मागील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस झाला तसेच महाबळेश्वर सातारा वाई या परिसरामध्ये पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतकरी काहीसा सुखावला आहे.
हे बघा:
