पुढील 24 तासात या 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, विजांसह पाऊस
सप्टेंबर २९, २०२३आज महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना दुपारनंतर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात चांगल्या पावसाला सुरुवात झाली त्यामुळे धरणांची पातळी सुधारण्यास मदत झाली.
या वर्षीच्या पावसाचा विचार केला तर यंदा पावसाळा उशिरा सुरू झाला त्यातच ऑगस्ट महिन्यामध्ये पडलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना मोठा झटका बसला मान्सून उशिरा आला आणि मान्सूनने परतीचा प्रवास पण उशिराच सुरू केला.
हवामान विभागाच्या नवीन हवामान अंदाजानुसार आज पुणे आणि मुंबईला जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच विदर्भामधील काही जिल्ह्यांमध्ये पण आज मुसळधार पाऊस पडू शकतो. दोन ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातील पावसाची तीव्रता कमी होईल असे मत हवामान विभागाने व्यक्त केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील दोन दिवस चांगला पाऊस पडू शकतो तसेच महाराष्ट्र व्यतिरिक्त पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांमध्ये पण जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यावर देण्यात आला आहे. सध्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र काही क्षेत्र कमी हिण्या सुरुवात झाली आहे पण त्याचा प्रभाव अजूनही कायम आहे.
यावर्षी देखील गणपतीच्या दहा दिवसांमध्ये चांगला पाऊस पडला व त्यामुळे धरणांची पातळी काहीशी सुधारली आहे यावर्षी काही ठिकाणी खूपच अतिवृष्टी सदृश्य पाऊस तर काही ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत हवामान विभागाचा हवामान अंदाज कितीपट सत्य ठरतो हे बघणे गरजेचे ठरते
