अशाप्रकारे मुरघास तयार करून मिटवा चाऱ्याचे टेन्शन, संपूर्ण मुरघास प्रक्रिया

यावर्षी अनियमित स्वरूपामध्ये पाऊस पडला आहे त्यामुळे जनावरांच्या चाराचा प्रश्न आत्ताच निर्माण झाला आहे पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात हिरव्या चाऱ्याचा प्रश्न आणखी उद्भवण्याची शक्यता आहे म्हणूनच आजच्या या लेखात आपण मुरघास कसा बनवायचा, मुरघास साठी कोणत्या प्रकारच्या चाऱ्यांची निवड करावी तसेच अन्य उपयुक्त माहिती जाणून घेऊया.

मुरघास करण्यासाठी मक्का ज्वारी तसेच गिन्नी गवताचा उपयोग केला जाऊ शकतो परंतु मुख्यतः महाराष्ट्रात मका मुरघास प्रचलित आहे. यासाठी चाऱ्याची अर्धा ते पाऊण इंच लांबीची कुट्टी करावी. मुरघास तयार करत असताना उंच जागेवरती खड्डा करावा व पावसाचे पाणी त्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी. 

Silage making marathi

तयार केलेल्या खड्ड्याच्या भिंती गुळगुळीत असाव्यात व कोपरे काहीसे गोलाकार असावेत तयार केलेल्या खड्ड्यांमध्ये प्लॅस्टिक कागद अंथरावा व त्यावर काहीशी कुट्टी टाकावी. एक क्विंटल हिरव्या चाऱ्याच्या कुट्टी वर प्रक्रिया करण्यासाठी युरिया एक किलो, गूळ दोन किलो, मीठ अर्धा किलो तसेच खनिज मिश्रण एक किलो घेऊन 15 लिटर पाण्यामध्ये चांगले मिसळावे.

कुट्टी चा एक थर लावल्यानंतर त्यावरती संबंधित मिश्रण पसरावे व त्यावरती परत कुट्टी टाकावी. त्यानंतर त्यावर मिश्रण फवारावे. अशाप्रकारे आपण कुट्टी चे थर भरावेत भरावेत. कुटीचे थर भरत असताना वेळोवेळी ते चांगले दाबून घट्ट बसतील याची काळजी घ्यावी. मुरघासाचा खड्डा भरायला घेतल्यानंतर एक ते दोन दिवसात तो पूर्ण भरून घ्यावा.

संबंधित खड्डा पूर्ण भरल्यानंतर त्यावरती प्लास्टिकचे आच्छादन टाकावे व त्यावरती मातीचा थर द्यावा जेणेकरून आतील हवा बंद होईल. पुढे 40 ते 60 दिवस तो खड्डा तसेच राहून द्यावे जेणेकरून आतील आंबवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. 

हे पण बघा: पुंगणूर छोट्या गाई विषयी माहिती

पारंपारिक पद्धतीप्रमाणेच आपण प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकचे ड्रम तसेच बांबूच्या चौकटींमध्ये देखील मुरघास करू शकतो. परंतु खड्डा तयार करून निर्माण केलेला मुरघास अधिक चांगला परिणाम देतो व त्याला बुरशी लागण्याचे प्रमाण कमी असते असे शेतकऱ्यांचे मत आहे. 

पालक लागवडीसाठी सर्वोत्तम जाती