कपाशीची वाढ नियंत्रित करा, कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवा

Cotton management: सध्या महाराष्ट्रातील कपाशी ही फूल व बोंडे लागण्याच्या अवस्थेमध्ये आहे जर तुम्ही पारंपारिक पद्धतीने कपाशी लागवड केलेली असेल तर कपाशीमध्ये सध्या जास्त फांद्या आणि पानांची वाढ बघायला मिळते त्यामुळे झाडाचा जास्त अन्न रसाचा पुरवठा फांद्यांना आणि पानांना मोठे करण्यात होतो म्हणूनच अशा परिस्थितीत कापूस बोंडांवर परिणाम होऊ शकतो.

आपण कपाशीची लागवड केल्यानंतर वाढत्या फांद्यांमुळे व पानांमुळे दोन कपाशी मधील अंतर कमी होते व त्याचा डायरेक्ट परिणाम कपाशीच्या उत्पन्नावर दिसून येतो व जर हे रोखायचे असेल तर आपण सायक्रोशील या रसायनाची 1.2 मिली लिटर प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणामध्ये कपाशीचे पीक अडीच महिन्यांचे झाल्यानंतर फवारणी करावी. 

Cotton management

संबंधित रसायनाच्या फवारणीनंतर झाडांची अवास्तविक वाढ थांबते व अनावश्यक फांद्यांना होत असलेला अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होऊन तो कपाशीच्या बोंडांकडे जातो त्यामुळेच कपाशीच्या बोंडांचा आकार वाढतो परिणामी कपाशी उत्पन्नामध्ये वाढ बघायला मिळते.

जर आपण रासायनिक पद्धतीने कपाशीची वाढ रोखण्यास इच्छुक नसाल तर आपण यासाठी दुसरा पारंपारिक उपाय अवलंबू शकतो. यामध्ये आपण कपाशीच्या झाडांचे शेंडे खुडून आणि फांद्यांची होणारी अवास्तव वाढ थांबू शकतो. जेव्हा कापूस पीक हे साडेतीन ते चार फूट उंचीपर्यंत जाते त्यानंतर आपण कपाशीचा शेंडा कट करू शकतो. 

हे बघा: तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचे संपूर्ण नियोजन

कपाशीचा शेंडा खुडत असताना प्रत्येक झाडावर 12 ते 16 फळ फांद्या राहतील याची काळजी घ्यावी व असे केल्यामुळे पिकांची अनियमित होणारी वाढ थांबते व किडींचा धोका देखील कमी होतो तसेच उत्पादनामध्ये चांगला परिणाम बघायला मिळतो.

दररोज अशाच प्रकारच्या नावीन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्यायला विसरू नका अशीच नवनवीन नावीन्यपूर्ण माहिती या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसारित केली जाते. 

हे पण वाचा:

1.  सर्वात छोट्या पुंगनूर गाई विषयी संपूर्ण माहिती 

2. सुधारित सोयाबीन लागवड तंत्रज्ञान

3. पालक लागवड जाती