Onion meeting: आज प्रमुख नेत्यांची कांदा-चर्चा, कधी सुटणार कांद्याची कोंडी

 मागच्या दहा दिवसांपासून नाशिक मधील कांदा लिलाव बंद आहे व सरकारच्या निर्यात धोरणाविषयी चर्चा करण्यासाठी आज 29 सप्टेंबर ला वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. कांदा लिलाव बंद असल्यामुळे कांद्याची मोठी उलाढाल बंद झालेले आहे व केंद्र सरकार कांदा व्यापाऱ्यांच्या मागण्या मान्य करणार की नाही हे बघणे गरजेचे असते.

नाफेड तसेच एनसीपीएफने कांदा मार्केट आवारात कांदा विक्री करू नये तसेच कांदा विक्रीवरील 40 टक्के शुल्क हटवावे यासाठी नाशिक येथील कांदा व्यापारी संप करत आहेत व त्या संदर्भात आज मीटिंग झाली. परंतु या बैठकीला कृषिमंत्री धनंजय मुंडे तसेच उपमुख्यमंत्र्यांनी दांडी मारली. 

Onion meeting

संबंधित मोठे नेते बैठकीला उपस्थित नव्हते त्यामुळे विरोधकांकडून सरकारवर या संदर्भात टीका केली जात आहे तसेच मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या कांदा व्यापाऱ्यांच्या संपामुळे सुमारे तीनशे कोटी रुपयांचा कांदा व्यवहार ठप्प झाला आहे.

मागे तीन दिवसांपूर्वी देखील केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर महाराष्ट्रातील नेत्यांची चर्चा झाली होती परंतु त्यामधून देखील समाधानकारक उपाय निघालेला नाही तसेच आज देखील चर्चा झाली परंतु तोडगा भेटलेला दिसत नाही.

बैठक झाल्यानंतर अब्दुल सत्तार तसेच केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आणखी 2 लाख टन कांदा खरेदीला नाफेड तसेच एनसीपीएफला परवानगी दिल्याचे त्यांनी सांगितले. निर्यात शुल्क बाबत निर्णय घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

केंद्र सरकारच्या राज्य सरकार बरोबर वेळोवेळी बैठकी सुरू आहेत परंतु त्यामध्ये कांदा प्रश्नावरती तोडगा निघताना बघायला मिळत नाही त्याचबरोबर काही राज्यांमध्ये देखील निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत परंतु या सर्व मध्ये सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होताना बघायला मिळत आहे. 

1. कमी खर्चात मुरघास तयार करायला शिका

2. टोमॅटो तरात कधी होईल सुधारणा बघा