पालक लागवड साठी या जातींची निवड करा, भरघोस उत्पादन मिळवा

 मुख्य पालेभाज्यांमध्ये पालक या भाजीचे प्रमुख स्थान आहे पालक मधील असलेल्या जास्त लोहाच्या प्रमाणामुळे पालक भाजीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पालक भाजी मध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिने, कॅलरीज तसेच फायबर मोठ्या प्रमाणात आढळतात.

पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र तसेच इतर अनेक राज्यांमध्ये पालक लागवड केली जाते. पालक लागवड तिन्ही ऋतूंमध्ये केले जाते त्यामुळे पालक उत्पादक क्षेत्र वाढत आहे. पालक लागवड करण्यापूर्वी पालक यांना दोन ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. 

Spinach variety maharashtra

पालक लागवड करण्यासाठी दोन ओळींमधील अंतर 25 ते 30 सेंटिमीटर व दोन रोपांमधील अंतर पाच ते सात सेंटीमीटर ठेवावे. पालक पिकापासून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी सुधारित जातींचा उपयोग करणे गरजेचे ठरते. पालक उत्पादनासाठी तुम्ही पुढील पालक जातींचा उपयोग करू शकता.

पालक लागवड ही जून-जुलै तसेच जानेवारी-फेब्रुवारी आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यांमध्ये करता येते. आपण वर्षभरात तीन वेळा पालक उत्पन्न प्राप्त करू शकतो.

पालक पिकाच्या काही उत्तम जाती

1. देशी पालक: भारतातील बहुतांश शेतकरी देशी पालक या पालक जातीची निवड करतात. या जातीच्या पालकची पाने लहान असतात व गुळगुळीत असतात त्यामुळे या पालक जातीला मार्केटमध्ये चांगली मागणी असते

2. पंजाब निवड: पालकची या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे संबंधित पालक खोडापाशी थोडीशी जांभळट कलरची असते व या जातीच्या पालक ची पाने लांब आणि पातळ असतात. संबंधित पालक चवीला किंचित आंबट असते. एकरी दहा ते बारा टन उत्पादन या पालक जातीपासून मिळू शकते.

3. ऑल ग्रीन: एकदा या पालक जातीची लागवड केल्यानंतर आपण पाच ते सहा वेळा संबंधित झाडापासून पालक उत्पादक घेऊ शकतो परंतु हिवाळ्यामध्ये या जातीची पालक निर्माण होण्यासाठी 70 दिवसांचा कालावधी लागतो. संबंधित पालक जातीपासून अधिक उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. 

हे पण वाचा: 

1. सुधारित सोयाबीन लागवड तंत्रज्ञान 

2. पुंगणूर छोट्या गाई विषयी माहिती 

3. तूर पिकाच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण